देशभरात लोकसभा निवडणुकीचा प्रचार दिवसेंदिवस तीव्र होताना दिसून येत आहे. सर्व पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. इंडिया आघाडीने एनडीएला यंदाच्या निवडणुकीत पराभूत करण्याचा चंग बांधला आहे. तर एनडीएने केंद्रात तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यासाठी प्रचाराला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात प्रचार सभांचा धडाका लावला आहे. तर नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रात महायुतीने ४५ प्लस मिशन डोळ्यांसमोर ठेवले आहे. आज आपण परभणी लोकसभा मतदारसंघाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तिथे महायुती आणि महाविकास आघाडीने, वंचित बहुजन आघाडीने कोणाला उमेदवारी दिली आहे. राजकीय ताकद कशी आहे. तेथील प्रश्न कोणते आहेत, हे जाणून घेणार आहोत.
नमस्कार. मी तेजस भागवत. ऋतं मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. महायुतीने विद्यमान खासदार संजय जाधव यांच्या विरोधात रासपचे महादेव जानकर यांना उमदेवारी दिली आहे. या लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे वर्चस्व आहे. दरम्यान हे वर्चस्व मोडून काढण्यासाठी महायुतीचे नेते झपाट्याने कामाला लागले आहेत. महायुतीच्या वरिष्ठ पातळीवरून देखील परभणीत जोर लावलेला पाहायला मिळतोय. २६ तारखेला या ठिकाणी मतदान होणार आहे. त्या आधीच जातीय समीकरणांची फेरमांडणी आणि आकडेमोड सुरु आहे.
शिवसेनेला परभणीत आपले हात पाय पसरत आलेले नाहीत. मात्र महादेव जनकरांच्या माध्यमातून त्यांना ठाकरे गटाला पराभूत करायचे आहे. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचा विजय सुकर करण्यासाठी अजित पवारांना देखील जानकरांची मदत लागणार आहे. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेस परभणीत जानकरांसाठी झटताना दिसून येत आहे.
भाजपाने विद्यमान खासदार संजय जाधव यांच्याविरोधात आक्रमक प्रचार सुरु केला आहे. १० वर्षांच्या खासदारकीच्या त्यांनी काहीच विकासकामे केली नसल्याचा प्रचार करण्यात येत आहे. महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी देखील यावरूनच संजय जाधव यांच्यावर टीका सुरु केली आहे. रस्ते, पाणी, उदयोगधंदे, रोजगादी अशा जीवनाश्यक सुविधा योग्य प्रमाणत दिल्या गेल्या नाहीयेत. तर संजय जाधव हे भाजपवर टीका करत आहे. राजकीय सुडापोटी त्यांनी येथील विकासासाठी मदत केली नाही असा प्रचार त्यांच्याकडून केला जात आहे. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी, मराठा आंदोलनातील ज्येष्ठ कार्यकर्ते, आणि अनेक अप्सकः उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
सध्या दोन्ही बाजूनी मतविभागणी टाळण्याचे प्रयत्न सुरु आहेत. प्रतिस्पर्ध्याच्या विभागातील मतदान फोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. भाजपचे परंपरागत मतदार व ओबीसी समाज यांवर जनकरांचे भवितव्य अवलंबून आहे. तर संजय जाधव यांची मदार मराठा आणि मुस्लिम समाजाच्या मतांवर असणार आहे. या ठिकाणी साधारणतः २० ते २१ लाख मतदार आहेत. भाजपचे नेते ठाकरे गटाला पराभूत करण्यासाठी परभणीत तळ ठोकून बसले आहेत. त्यामुळे ही लढाई किती निर्वाणीची आहे हे लक्षात येत आहे. जनता जनार्दन कोणाला परभणीच्या खासदार म्हणून निवडणार हे तर ४ जुनलाच स्पष्ट होणार आहे.