आज देशभरात लोकशाहीचा उत्सव साजरा केला जात आहे. ७ टप्प्यांपैकी आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. १३ राज्यांतील ८८ जागांवर मतदान होत आहे. महाराष्ट्रातील ८ जागांवर मतदान होत आहे. दरम्यान दुसऱ्या टप्प्याचे मतदान सुरु असतानाच EVM मशीन बाबत सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने EVM VVPAT बाबत महत्वाचा निर्णय दिला आहे. तर बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची याचिका फेटाळून लावली आहे.
VVPAT ची पडताळणी करण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने एकमताने हा निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. EVM बाबत काही संघटनांनी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल केल्या होत्या. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मध्ये छेडछाड करणे शक्य नसल्याचे निवडणूक आयोगाने कोर्टाने सांगितले होते. त्यानंतर पडताळणी करून सुप्रिम कोर्टाने हा निर्णय दिला आहे.