Salman Khan Firing : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणात आणखी एक नवीन अपडेट समोर आली आहे. या गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापनने आत्महत्या केली आहे. अनुजने पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यानंतर त्याला रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अनुज थापन याने बाथरूममध्ये बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आरोपी अनुजने रात्री 12.30 वाजता आत्महत्या केली. त्यानंतर त्याला तातडीनं जीटी रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलीस कोठडीत झालेल्या या आत्महत्येच्या घटनेचा तपास राज्य सीआयडीकडे सोपवण्यात येणार आहे.
दरम्यान, रविवारी (14 एप्रिल) सकाळी सलमान खानच्या घरातील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार करण्यात आला होता. गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर दुचाकीवरून दोघे आले आणि त्यांनी पाच राऊंड गोळीबार करून पळ काढला. घटनेनंतर दोन्ही आरोपींनी ओळख लपवण्यासाठी तीन वेळा कपडे बदलले. आरोपींकडे 40 गोळ्या असल्याचंही पोलीस तपासात समोर आलं आहे.
सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर या घटनेची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल याने स्वीकारली होती. याप्रकरणी विकी गुप्ता, सागर पाल आणि अनुज थापन यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, अनुज थापनने आत्महत्या केली आहे.