२२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या भव्य मंदिराचे लोकार्पण करण्यात आले आहे. ५०० वर्षांची प्रतीक्षा पूर्ण झाली आहे. दरम्यान २२ जानेवारीपासून लाखो भाविकांनी या ठिकाणी भेट दिली आहे. तर आज देशाच्या सर्वोच्च आणि प्रथम नागरिक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अयोद्धेयत जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले आहे. तसेच शरयू घाटावर जात त्यांनी आरती देखील केली आहे.
https://twitter.com/rashtrapatibhvn/status/1785685599074320774/photo/4
अयोध्येत राम मंदिराला भेट दिल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ते म्हणाल्या, ”अयोध्येत प्रभू श्री रामाचे बालस्वरूप पाहण्याचा दिव्य अनुभव शब्दात मांडणे मला शक्य नाही. राम केवट संवादापासून भगवान श्रीरामांनी माता शबरीची उष्टी बोरे खाण्यापर्यंत अशा हृदयस्पर्शी घटना सतत स्मरणात राहतात. मी भावनेने भारावून गेले आहे. हे मंदिर भारतीय संस्कृती आणि समाजाच्या आदर्शांचे असे जिवंत प्रतीक आहे की ते देशवासियांना सर्वांच्या कल्याणासाठी कार्य करण्याची प्रेरणा देत राहील. मला देशवासीयांच्या कल्याणासाठी भगवान श्रीरामाची प्रार्थना करण्याची संधी मिळाली, मी हे एक दैवी वरदान मानते. या काळात आपल्या राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या प्रवासात सहभागी होणे आणि त्यात सहभागी होणे हा एक विशेषाधिकार आहे.”