जनता दल (एस) चे नेते प्रज्वल रेवण्णा यांचा शोध घेण्यासाठी कर्नाटक सरकारने केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ला इतर देशांची मदत घेण्याचे आवाहन केले आहे. रेवन्नावर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. विशेष तपास पथकाने (एसआयटी) आज कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना रेवण्णाविरोधात सुरू असलेल्या तपासाबाबत माहिती दिली. या बैठकीनंतर सीबीआयशी संबंधित हे पाऊल उचलण्यात आले आहे.
कर्नाटकचे राजकारण दिवसेंदिवस वेगवगेळ्या घटनांमुळे सारखे बदलत आहे. अनेक महिलांकडून लैंगिक छळाचे आरोप झालेले माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या अडचणीत वाढ होत आहे. त्याच्यावर बलात्काराच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी प्रज्वल रेवण्णा आणि त्याचे वडील एचडी रेवण्णा यांच्याविरोधात पुन्हा एकदा लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. स्वत: गृहमंत्री परमेश्वर याबाबतची माहिती दिली आहे. या लुकआऊट नोटिशीबाबत बोलताना कर्नाटकचे गृहमंत्री परमेश्वर म्हणाले, ”आम्ही एचडी रेवण्णा आणि प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे. ते कदाचित परदेशात जाऊन शकतात त्यामुळे आम्ही त्यांच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी केली आहे. त्यांच्याकडे या नोटिशीला उत्तर देण्यासाठी आज संध्याकाळपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे.”
गृहमंत्री परमेश्वर पुढे बोलताना म्हणाले, ”रेवण्णा यांनी म्हैसूर अपहरण प्रकरणात जामिनासाठी याचिका केली आहे. यामध्ये एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ” दरम्यान माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू, कर्नाटकचे खासदार प्रज्वल रेवन्ना (Prajwal Revanna) याचं नाव सेक्स स्कँडलमध्ये (Sex Scandal) समोर आलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रज्वल यांचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरला आहे. त्यामुळे ते चांगलेच वादात अडकले आहेत. अशा परिस्थितीत आता जनता दल सेक्युलरने (JDS) प्रज्वल यांना मोठा धक्का दिला आहे