लोकसभा निवडणुकीसाठी ७ मे म्हणजेच उद्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. देशभरात १२ राज्यांमध्ये ९४ जागांवर उद्या मतदान होणार आहे. ९४ जागांपैकी गुजरातमध्ये २५ जागा, कर्नाटकमधील १४ आणि महाराष्ट्रमधील ११ जागांचा समावेश आहे. तसेच मध्य प्रदेश मधील ९, छत्तीसगडमधील ७, बिहारमधील ५ , आसाममधील ४ आणि गोव्यातील २ जागांचा समावेश आहे.
मध्यप्रदेशमध्ये शिवराजसिंह चौहान, ज्योतिराधित्य सिंधिया आणि दिगविजय सिंह यांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. ९४ जागांवर १२७ उमेदवार निवडणुकीला उभे राहिले आहेत. यामधील काही जागा या अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यासाठी देखील राखीव आहेत. गुजरातच्या गांधीनगरमधून केंद्रीय गृह मंत्री अमित शहा देखील उभे राहिले आहेत. त्यांचे भवितव्य देखील मतपेटीत बंद होणार आहे.