Loksabha Election 2024 3rd Phase : आज (7 मे) लोकणुसभा निवडणुकीसाठी मतदानाचा तिसरा टप्पा पार पडत आहे. महाराष्ट्रातील 11 जागांवर आज मतदान पार पडणार आहे. यामध्ये सातार, कोल्हापूर, बारामती, सोलापूर, रायगड, उस्मानाबाद, सांगली, लातूर, माढा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि हातकणंगले या जागांवर मतदान पार पडणार आहे. यासोबतच उत्तर प्रदेशात 10, गुजरातमध्ये २५, मध्य प्रदेशातील 9, कर्नाटकातील 14, छत्तीसगडमधील 7, आसाममधील 4, बिहारमधील 5, पश्चिम बंगालमधील 4, गोव्यातील 2 आणि दादर नगर आणि दमण दीव या केंद्रसशासित प्रदेशातील प्रत्येकी एका जागेवर मतदान पार पडणार आहे.
आज होणाऱ्य़ा तिसऱ्या टप्प्यातील मतदानामध्ये फक्त राज्यातीलच नाही तर देशातील अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. यामध्ये उदयनराजे भोसले, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, धैर्यशील मोहिते-पाटील, नारायण राणे, सुनिल तटकरे, प्रणिती शिंदे, छत्रपती शाहू महाराज, अमित शाह, शिवराज सिंह चौहान अशा अनेक बड्या नेत्यांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये कैद होणार आहे.