Supriya Sule : लोकसभा निवडणुकीसाठी आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. या तिसऱ्या टप्प्यात 11 राज्यातील एकूण 93 जागांवर मतदान होत आहे. सध्या राज्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी दत्तात्रय भरणेंविरोधात तक्रार दाखल केली आहे.
नुकतीच सुप्रिया सुळेंनी दत्तात्रय भरणेंविरोधात तक्रार दाखल केली आहे. भरणे गावातील लोकांना धमकावत असल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केला आहे. त्यामुळे त्यांनी भरणेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
सुप्रिया सुळेंनी भरणेंविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आजच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानामध्ये फक्त राज्यातीलच नाही तर देशातील अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. यामध्ये उदयनराजे भोसले, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, धैर्यशील मोहिते-पाटील, नारायण राणे, सुनिल तटकरे, प्रणिती शिंदे, छत्रपती शाहू महाराज, अमित शाह, शिवराज सिंह चौहान अशा अनेक बड्या नेत्यांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये कैद होणार आहे.