यंदा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. ५ जूनपासून या वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मात्र या स्पर्धेवर दहशतवादी हल्ल्याचे संकट घोंघावत आहे. वेस्ट इंडिज आणि कॅरेबियन देशांमध्ये दहशतवादी हल्ल्यांची धमकी मिळाल्याचे सांगितले जात आहे. उत्तर पाकिस्तानमधून दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाली आहे. यानंतर वेस्ट इंडिजने खबरदारी घेत चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवला आहे.
उत्तर पाकिस्तानमधून वेस्ट इंडिज आणि कॅरेबियन देशांमध्ये हल्ल्याची धमकी मिळाली आहे. या देशांमध्ये वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाल्यानंतर वेस्ट इंडिज प्रशासन सावध झाले आहे. चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्पर्धेदरम्यान सुरक्षा अधिक चोख ठेवली जाणार आहे. त्यामुळे क्रिकेट बोर्ड आणि देशाच्या प्रशासनाने योग्य ती पाऊले उचलली आहेत.