चार दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या जवानांवर दहशतवादी हल्ला झाला होता. भारतीय हवाई दलाच्या वाहन ताफ्यावर हा हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. या भ्याड हल्ल्यात ५ जवान जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट देण्यात आला आहे. बसच्या ताफ्यावर हा हल्ला करण्यात आला. देशात निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना हा हल्ला झाल्याने सर्वत्र सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील रेडवानी भागात सुमारे ४० तास चाललेले ऑपरेशन गुरुवारी सकाळी संपले. यावेळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
सोमवारपासून सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी बुधवारी संध्याकाळी रेडवानी भागात झालेल्या चकमकीत आणखी एका दहशतवाद्याला ठार केले. या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. याआधी मंगळवारी सर्वोच्च टीआरएफ कमांडर बासित अहमद दार आणि त्याचा सहकारी फहीम अहमद बाबा मारले गेले .भारतीय लष्कराने 40 तासांच्या देखरेखीनंतर तीन दहशतवाद्यांना ठार करून “ऑपरेशन रेडवानी पाइन” पूर्ण केले आहे. चकमकीच्या ठिकाणाहून युद्ध साहित्यही जप्त करण्यात आले आहे.