आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे अनावरण करण्यात आले. राजधानी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात हा सोहळा पार पडला. यावेळी सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या महिला न्यायधीश एम. फातिमा यांना पद्म भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांना हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला आहे. याशिवाय अभिनेता वैजयंतीमाला आणि अभिनेता चिरंजीवी यांना देखील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद्म भूषण पुरस्कार देऊन गौरविले.
तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अंदमान आणि निकोबार येथील शेतकरी के. चेल्लम्मल यांना कृषी क्षेत्रात क्षेत्रात पद्मश्री, जोश्ना चिनप्पा यांना क्रीडा क्षेत्रात, हिंदुस्थानी शास्त्रीय गायक सोम दत्त बट्टू यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले. सत्यनारायण बेलेरी यांना कृषी क्षेत्रात आणि जॉर्डन लेपचा यांना कला क्षेत्रात सन्मानित करण्यात आले.