Mithun Chakraborty On Salman Khan Marriage : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचा चाहता वर्गही मोठ्या संख्येत आहे. सलमानची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते नेहमी आतुर असतात. त्यात तरूणी तर सलमान खानला पाहताच त्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाहीत. तसेच सलमान खान लग्न कधी करणार? असा प्रश्न आजही त्याच्या चाहत्यांना पडतो. पण याचं उत्तर अद्यापही कोणाला मिळालेलं नाहीये. तर आता ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी नुकत्याच दिलेल्या एखा मुलाखतीत सलमानच्या लग्नाबाबत मोठा खुलासा केला आहे.
मुलाखतीदरम्यान मिथुन चक्रवर्ती यांनी सलमान खानबाबत भाष्य केलं. ते म्हणाले, “सलमान खान हा खूप मस्ती करत असतो. तसेच त्याच्या मनात माझ्याविषयी खूप प्रेम आहे. जेव्हाही आम्ही एकत्र असतो तेव्हा तो एक मिनिटही शांत बसत नाही. आम्ही एकदा रशियामध्ये चित्रपटाचं शूटिंग करत होतो, तेव्हा तो मध्यरात्री 2 वाजता माझ्या रूममध्ये आला होता. तो रूममध्ये कसा आला हे मला आजपर्यंत समजलेलं नाहीये. जेव्हा मी झोपेतून उठलो होतो तेव्हा तो माझ्यासमोर हसत उभा राहिला होता.”
पुढे सलमानच्या लग्नाबाबत मिथुन चक्रवर्ती म्हणाले, “सलमान कधीच लग्न करणार नाही. एखादीला वाटू शकते की तो किती हँडसम सुपरस्टार आहे, कदाचित तो माझ्याशी लग्न करेन. पण मी गॅरंटी देतो की सलमान कधीच लग्न करणार नाही. मात्र, अशा हँडसम मुलाच्या प्रेमात कोण पडू शकणार नाही हे तुम्हा मला सांगा”, असं मिथुन चक्रवर्ती म्हणाले.
दरम्यान, सलमान खानचं आजपर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडलं गेलं आहे. त्याचं आणि ऐश्वर्या रायचं अफेअर सर्वांनाच माहिती आहे. त्यानंतर तो कतरिना कैफला डेट करत होता. कतरिनासोबत ब्रेकअप झाल्यानंतर सलमानचं नाव लुलिया वंतुरशी जोडलं गेलं होतं. पण हे दोघे त्यांच्या नात्याबाबत कधीच व्यक्त झाले नाहीत.