लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचे स्टार प्रचारक देशभरात अनेक सभा घेत आहेत. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज झारखंड दौऱ्यावर होते. सध्या विरोधकांकडून भाजपा सत्तेत आल्यास आरक्षण संपवणार आहे असा आरोप करत आहे. दरम्यान राजनाथ सिंह यांनी झारखंड येथील एका प्रचारसभेत बोलताना आदिवासींचे आरक्षण कोणीही काढू शकत नाही असे राजनाथ सिंह म्हणाले आहेत.
राजनाथ सिंह आज झारखंडमधील दुमका मतदारसंघात भाजपा उमेदवार सीता सोरेन यांच्या प्रचारार्थ सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी आरक्षण या विषयावरील विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. तसेच आदिवासी समाजाचे आरक्षण कोणीही संपवू शकत नाही असे सिंह म्हणाले. “विरोधक भाजपवर आरक्षण संपवल्याचा खोटा आरोप करतात. पण मी म्हणतो की मी आरक्षण कधीच संपणार नाही. मी आदिवासी समाजातील लोकांना आश्वासन देतो की तुमचे आरक्षण कोणीही संपवू शकत नाही,” सिंह यांनी दुमका येथील निवडणूक रॅलीत सांगितले.
तसेच राजनाथ सिंह यांनी आपल्या प्रचारसभेत गेल्या १० वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकारने केलेल्या कामांची यादी वाचली. भारतातून गरिबी हटविण्याचे स्वप्न मोदींनी पहिले आहे. तसेच देशाची अर्थव्यवथा ११ व्या स्थानावरून ५ व्या स्थानावर आणून दाखवली. अनेक कामांबद्दल राजनाथ सिंह यांनी भाष्य केले.