भाजपा नेते, खासदार आणि कुस्ती महापटू संघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांना दिल्लीच्या राउस कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. महिला कुस्तीपटुंच्या लैंगिक शोषण प्रकरणात यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आदेश दिल्लीच्या राउस एव्हेन्यू कोर्टाने दिले आहेत. याचबरोबर ब्रिजभूषण सिंह यांचे सचिव यांच्यावर देखील आरोप निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले आहे. आरोप निश्चित करण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.
१५ जून २०२३ रोजी दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरुद्ध कलम ३५४ अन्वये , ३५४ ए, ३५४ डी, अंतर्गत गुन्हा नोंदवला होता. त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. ब्रिजभूषण सिंह यांच्यावर ६ महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केले होते. त्यांच्यावर आरोप झाल्याने यंदा त्यांना भाजपाने लोकसभेचे तिकीट दिले नाही आहे. त्यांच्या ऐवजी त्यांच्या मुलाला तिकीट दिले आहे. त्यामुळे तिकीट कापले जाणे आणि आता कोर्टाकडून आरोप निश्चित होणे असे दुहेरी धक्के ब्रिजभूषण सिंह यांना बसले आहेत.