सध्या देशात राष्ट्रीय तपास यंत्रणा अनेक ठिकाणी छापेमारी करत आहे. एनआयएने आज जम्मू आणि काश्मीरमध्ये छापेमारी केली आहे. दहशहतवाद्यांशी संपर्क आणि अन्य कारणांसाठी ही छापेमारी करण्यात आली. देशातील दहशतवादी नेटवर्कवर मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू आहे. , राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा भागात हिज्बुल मुजाहिदीन (HM) सदस्यांच्या चार मालमत्ता जप्त केल्या. जम्मू-काश्मीरमध्ये प्रतिबंधित जैश-ए-मोहम्मद (JeM) या दहशतवादी संघटनेच्या शीर्ष दहशतवाद्याच्या सहा स्थावर मालमत्ता जप्त केल्याच्या एका दिवसानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या चार मालमत्ता तपासानुसार दहशतवादातून मिळालेल्या पैशातून निर्माण झाल्या आहेत. याचा वापर दहशतवादी कट रचण्यासाठी आणि दहशतवादी हल्ले करण्यासाठी केला जात असे. ही मालमत्ता आरोपी मोहम्मद आलम भट, मोहम्मद युसूफ ख्वाजा, शब्बीर अहमद गखड, झाकीर हुसेन मीर यांच्याशी जोडलेली आहे. हे सर्व पाकिस्तानस्थित हिज्बुलचे हँडलर, ऑपरेटीव्ह आणि कमांडर यांच्याशी जोडलेले आहेत.