गेल्या काही दिवसांमध्ये सुरक्षा दले आणि नक्षलवादी यांच्यात सातत्याने चकमक होत आहे. केंद्र सरकारने नक्षलवादी कारवाई संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी मोठी पावले उचलली आहेत. छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दले आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरु आहे. त्यात आतापर्यंत ६ नक्षलवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर आली आहे. अजून मृतांच्या संख्येत वाढ होऊ शकते. सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांच्या टॉप कमांडरला पीडिया जंगल परिसरात घेरले असल्याचे समजते आहे.
काल रात्रीपासून सुरक्षा दले आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरु आहे. या जंगलात सुरक्षा दलांनी मोठ्या नक्षलवाद्यांना घेरले असल्याचे कळते आहे. यामध्ये नक्षलवाद्यांचे अनेक कमांडर आणि टॉप कमांडर असण्याची शक्यता आहे. याठिकाणी सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकांकडून ही कारवाई करण्यात येत आहे. १,२०० जवानांकडून ही कारवाई सुरु असल्याचे समजते आहे. आतापर्यंत ६ नक्षलवाद्यांना ठार मारण्यात यश आले आहे.