राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने झोपडले आहे. काल पुणे शहरासह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली होती. अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतीला बसल्याचे पाहायला मिळाले. राज्यात अकोला आणि भंडारा जिल्ह्यात अजूनही अवकाळी पावसाचा जोर कायम आहे. या दोन जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी राजा संकटात सापडला आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यात गेले एक ते दोन दिवस अवकाळी पाऊस कोसळत आहे. अवकाळी पावसाचा फटका शेतीसह आणि फळबागांना बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. अकोला जिल्ह्यात देखील अनेक गावांना पावसाचा फटका बसला आहे. भाजीपाला, धान्य यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान पुढील काही दिवसांत राज्यात अवकाळी पावसाचा जोर कायम राहणार आहे. १५ ते १६ मे पर्यंत राज्यात अवकाळी पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.