सध्याचा काळ हा टेक्नॉलॉजीचा काळ आहे. AI चॅटजीपीटी अधिक नवनवीन अपडेट घेऊन येत आहे. अनेक कंपन्यांनी,देशांनी AI टूलचे वापर सुरु केला आहे. भारतात देखील याचा वापर सुरु झाला आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत झपाट्याने पुढे जात आहे. AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता हे त्या तंत्रज्ञानाचे उदाहरण आहे. अलीकडेच, SML India, Riyanlus, IIT चे सात विद्यार्थी आणि अबू धाबीच्या 3AI होल्डिंग कंपनीने संयुक्तपणे झेन हनुमान AI लॉन्च केले आहे.
हनुमान AI जे लोकांना फक्त एकाच भाषेत नाही तर ९८ भाषांमध्ये सहज उपलब्ध होऊ शकते. या ९८ भाषांपैकी 12 भाषा भारतीय आहेत, ज्यात हिंदी, पंजाबी, मराठी, आसामी, ओरिया, तेलगू, कन्नड, गुजराती, मल्याळम, सिंधी, तामिळ आणि बंगाली यांचा समावेश आहे. कोणताही अँड्रॉइड वापरकर्ता ज्याला हा जनरल AI हनुमान चॅटबॉट वापरायचा आहे तो कोणत्याही प्रीमियमशिवाय त्यांच्या प्ले स्टोअरवरून ते सहजपणे डाउनलोड करू शकतो. ते वापरण्यासाठी तुम्हाला कोणतेही अतिरिक्त पैसे देण्याची आवश्यकता नाही. याशिवाय, ॲपल वापरकर्ते अद्याप ही सेवा वापरू शकत नाहीत, त्यांच्यासाठी लवकरच ही सेवा सुरू केली जाईल.