छत्तीसगडमध्ये सुरू असलेली सुरक्षा दलांमधील आणि नक्षलवाद्यांमधील
चकमक अजूनही सुरु असल्याचे समजते आहे. आतापर्यंत १२ नक्षलवाद्यांना कंठस्नान
घालण्यात आले आहे. छत्तीसगडमधील गांगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पीडिया जंगलात
नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी आतापर्यंत १२
नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. मारल्या
गेलेल्या नक्षलवाद्यांमध्ये डीकेएसझेड, डीव्हीसीएम आणि एसीएम कॅडरचे मोठे कॅडर
मारले जाण्याची शक्यता आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख केली जात आहे. एसटीएफ
आणि डीआरजीचे दोन जवान जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
काल रात्रीपासून सुरक्षा दले आणि
नक्षलवादी यांच्यात चकमक सुरु आहे. या जंगलात सुरक्षा दलांनी मोठ्या
नक्षलवाद्यांना घेरले असल्याचे कळते आहे. यामध्ये नक्षलवाद्यांचे अनेक कमांडर आणि
टॉप कमांडर असण्याची शक्यता आहे. याठिकाणी सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकांकडून ही
कारवाई करण्यात येत आहे. १,२०० जवानांकडून ही कारवाई सुरु
असल्याचे समजते आहे. सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांच्या टॉप कमांडरला पीडिया जंगल
परिसरात घेरले असल्याचे समजते आहे.