Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंबाबत खळबळजनक दावा केला आहे. 1999 मध्ये उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे भाजपला सोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जातील, असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा असा वागू शकतो यावर आमचा विश्वास होता, पण ती आमची सर्वात मोठी चूक होती.
आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या आदरापोटी काही गोष्टी समजूनही आम्ही काही बोललो नाही. पण सत्य हे आहे की, युतीची सत्ता आल्यानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडू लागली होती. त्यांना 1999 मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यासाठी त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं होतं, असा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला होता.