PM Modi : गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरेंची त्यांची भूमिका जाहीर करत पंतप्रधान मोदींसाठी भाजप पक्षाला मनसेचा बिनशर्त पाठिंबा असल्याचे म्हटले. राज ठाकरेंच्या या निर्णयाचे महायुतीकडून स्वागत करण्यात आले. तर आता भाजपने राज ठाकरेंना सोबत का घेतले? या प्रश्नाचं उत्तर स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे.
भाजपला विजयाची खात्री असतानाही राज ठाकरेंना सोबत का घेतले? असा प्रश्न पंतप्रधान मोदींना लोकमतच्या मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, आम्हाला राज ठाकरे हे नवीन नाहीत. देशाला जो सर्वोच्च प्राधान्य देतो त्याचे आम्ही नेहमीच स्वागत करतो. मागील 10 वर्षांपासून आम्ही स्वबळावर बहुमतात आहोत, पण तरीही आम्ही नेहमी नव्या मित्रांचे स्वागत केले आहे.
आपल्या लोकशाहीसाठी एकत्र येणे हा आमचा उद्देश आहे. तसेच अधिकाअधिक राजकीय पक्षांनी एकत्र येऊन लोकांच्या कल्याणासाठी काम करणे कधीही चांगलेच असते, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.