आज देशभरात ९६ जागांसाठी म्हणजेच चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे.
सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. देशात ९६ तर महाराष्ट्रात ११
जागांवर मतदान होत आहे. राज्यातील नंदुरबार, जळगाव, बीड,
अहमदनगर,
पुणे,
शिरूर,
छत्रपती
संभाजीनगर, रावेर, शिर्डी, मावळ, जालना या लोकसभा मतदारसंघासाठी मतदान सुरु झाले आहे. तर झारखंड,
पश्चिम
बंगाल, बिहार, तेलंगणा, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, ओडिशा, जम्मू-काश्मीर
या ठिकाणी मतदान होत आहे. मतदानापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत
देशातील नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले ट्विट केले आहे. यामध्ये ते
म्हणतात, ”लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज १० राज्यातील आणि
केंद्रशासित प्रदेशांमधील ९६ जागांवर मतदान हो आहे. मला विश्वास आहे की, या
सर्व जागांवर लोक मोठ्या संख्येने मतदान करतील. ज्यामध्ये तरुण, महिला
मतदान उत्साहाने सहभागी होतील. चला आपले कर्तव्य पार पाडून लोकशाही बळकट करूया.”
https://twitter.com/narendramodi/status/1789830956934730015
दरम्यान महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना
रंगणार आहे. दोन्ही बाजूनी मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात आला आहे. तसेच
एकमेकांवर आरोपांच्या फैरी देखील झाडल्या गेल्या आहेत. तसेच मुद्द्यांवर प्रचार
करण्यात आला आहे. त्यामुळे जनता कोणाला साथ देणारे हे आता ४ जूनलाच स्पष्ट होणार
आहे. एनडीएने अब की बार ४०० पार चा नारा दिला आहे. तर महायुतीतीने राज्यात ४५ प्लस
हे मिशन ठेवले आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.