आज लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले. सकाळी ७ च्या सुमारास चालू झालेले मतदान संध्याकाळी ६ वाजता संपले आहे. १० राज्यांमधील ९६ जागांवर आज मतदान झाले. त्यात महाराष्ट्रातील ११ जागांवर मतदान झाले आहे. दरम्यान दिवसभरात देशभरात कोणत्या राज्यात किती टक्के मतदान झाले आहे,ते जाणून घेऊयात. चौथ्या टप्प्यासाठी आज देशभरात एकूण ६२.३१ टक्के मतदान झाले आहे.
लोकसभा निवडणूक २०२४ साठी चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी (१३ मे) सकाळी ७ वाजता सुरू झाले आणि सायंकाळी ६ वाजता संपले. या टप्प्यात १० राज्यांमध्ये एकूण ९६ जागांवर मतदान झाले. ज्यामध्ये एकूण १,७१७उमेदवारांनी नशीब आपले आजमावले. चौथ्या टप्प्यातील संपूर्ण दिवसातील मतदानाची टक्केवारी समोर आली आहे. सायंकाळी ७ वाजेपर्यंत ६२.३१ टक्के मतदान झाले आहे.
आंध्र प्रदेश- 68.4%,उत्तर प्रदेश- 56.35%, ओडिशा- 62.96%, जम्मू काश्मीर- 35.75%, झारखंड- 63.14%, तेलंगणा- 61.16%, पश्चिम बंगाल- 75.66%, बिहार- 54.14%, मध्य प्रदेश- 68.01%,महाराष्ट्र- 52.49% ही १० राज्यांमधील संध्याकाळी ६ वाजता मतदान संपेपर्यंतची आकडेवारी समोर आली आहे.