काल मुंबई आणि उपनगर परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. जोरदार वाऱ्यासह आणि वादळी वाऱ्यासह हजेरी लावली आहे. घाटकोपरमध्ये सोमवारी होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला असून ८८ जण गंभीर जखमी झाले आहेत. या सर्वांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. घटनास्थळावरून आतापर्यंत ७४जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे, घटनास्थळावरून लोकांना बाहेर काढण्याचे काम अजूनही सुरू आहे, घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक अजूनही ढिगारा हटवण्याचे काम करत आहे.
सोमवारी दुपारी चारच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे घाटकोपर येथील पेट्रोल पंपाजवळ लावलेले होर्डिंग खाली पडले. या घटनेत आतापर्यंत सुमारे १४ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशीची घोषणा केली. तसेच मृतांच्या कुटुंबियांना ५लाखांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे.