लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंड मधील कोडर्मा येथे प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. विरोधकांवर टीकास्त्र सोडले. दरम्यान आजच नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे आपला लोकसभा उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांनी कोडर्मा येथील एनडीएच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन देखील केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनसभेला संबोधित करताना म्हणाले, ”केंद्रात एक भक्कम सरकार असल्यास ते सरकार, सर्वप्रथम देशाचे हित पाहत असते. ज्या ठिकाणी काँग्रेससारखे कमकुवत सरकार असते, तेव्हा असे सरकार देशाला देखील कमकुवत बनवते. असे कमकुवत सरकार कधीही देशवासीयांची भले करू शकत नाही. भाजपा सरकारने नक्षलवादावर नियंत्रण मिळवले. मोदीला समस्यांना टाळणे नव्हे तर, मोदीला समस्येला तोंड देता येते. ”
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ”आज देशभरात नक्षलवादाचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. आज मी कोडर्मा येथून सर्व देशवासियांना गॅरंटी देतो की, दहशतवाद असो किंवा मग नक्षलवाद. मोदीने आपल्या तिसऱ्या कार्यकाळात यांच्यावर खूप मोठा प्रहार करण्याचा संकल्प घेतला आहे. मोदी झारखंडला पुन्हा एकदा नक्षलवादाच्या गर्तेत जाऊन देणार नाही. युवकांचे आयुष्य वाया जाऊन देणार नाही.” अशा अनेक गोष्टींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रचारसभेत भाष्य केले.