केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने एक
अधिसूचना काढत देशभरात CAA कायदा
लागू केला आहे. लोकसभा निवडणुकीआधी केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला. लोकसभा
निवडणुकीसाठी सध्या सुरू असलेल्या मतदानादरम्यान केंद्र सरकारने नागरिकत्व
दुरुस्ती कायद्यातील तरतुदींची पहिली यादी
जारी केली आहे. CAA लागू
केल्यानंतर केंद्र सरकारने ३०० निर्वासितांना भारतीय नागरिकत्व दिले आहे आणि १४
जणांना नागरिकत्व प्रमाणपत्रेही दिली आहेत.
ही माहिती देताना गृह मंत्रालयाने सांगितले की, वर्षानुवर्षे भारतीय नागरिकत्व
मिळविण्यासाठी धडपडणाऱ्या ३०० निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे, तर १४ जणांना नागरिकत्व प्रमाणपत्रेही
देण्यात आली आहेत. नागरिकत्व (सुधारणा) नियम, २०२४ ची अधिसूचना लागू झाल्यानंतर बुधवारी प्रथमच १४ जणांना भारतीय
नागरिकत्व देण्यात आले. यासोबतच पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून छळलेल्या बिगर मुस्लिम स्थलांतरितांना
भारतीय नागरिकत्व देण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे.
CAA कायदा
जारी केल्यानंतर, आता
केंद्र सरकार ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत भारतात आलेल्या अत्याचारित गैर-मुस्लिम
स्थलांतरितांना (हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी
आणि ख्रिश्चन) भारतीय नागरिकत्व देण्यास सुरुवात करेल. सीएए डिसेंबर २०१९ मध्ये
मंजूर करण्यात आला आणि नंतर त्याला राष्ट्रपतींची संमती देखील मिळाली आहे. मात्र
यानंतर देशभरात या कायद्याच्या विरोधात प्रदर्शने करण्यात आली.