Manaoj Jarange Patil Health : मागील काही दिवसांपासून मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सभा आणि बैठकांचा धडाका सुरू आहे. तसेच येत्या 8 जूनला त्यांची बीडमध्ये भव्य अशी सभा होणार हाती. तर जरांगे 4 जूनला उपोषणाला बसणार होते. मात्र, मराठवाड्यामध्ये अचानक दुष्काळाचं सावट आल्यामुळे मनोज जरांगेंची ही सभा पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच ते त्यांच्या उपोषणाची तारीख नव्याने जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. अशातच आता जरांगेंची प्रकृती अचानक खालावली आहे.
मनोज जरांगेंची प्रकती अचानक बिघडली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांना तातडीनं छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभा घेतल्या होत्या. तर आज त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे सध्या ते रूग्णालयात उपचार घेत असून डॉक्टर त्यांची प्रकृती बरी व्हावी यासाठी विशेष लक्ष ठेवून आहेत.