डीआरजी (जिल्हा राखीव रक्षक) जवानांनी आज सकाळी टेत्राई टोलनाईच्या
जंगलात झालेल्या चकमकीत एका नक्षलवाद्याला ठार केले. एसपी किरण चव्हाण यांनी या
घटनेला दुजोरा दिला आहे. पोलीस अधीक्षक चव्हाण यांनी सांगितले की, शुक्रवारी
रात्री या जंगलात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाली होती. या इनपुटवर डीआरजीचे
जवान ऑपरेशनसाठी रवाना झाले. सकाळी झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला होता.
नक्षलवाद्यांच्या मृतदेहाजवळ एक बंदूक आणि मोठ्या प्रमाणात स्फोटकं सापडली आहेत.
चकमकीचे ठिकाण आणि आजूबाजूच्या परिसरात शोध सुरू आहे.
दरम्यान काही
दिवसांपूर्वी देखील सुरक्षा दले आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली होती.
छत्तीसगडमध्ये सुरू असलेली सुरक्षा दलांमधील आणि नक्षलवाद्यांमधील चकमक झाली. या
ऑपरेशमध्ये तब्बल १२ नक्षलवाद्यांना
कंठस्नान घालण्यात आले आहे. छत्तीसगडमधील गांगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील
पीडिया जंगलात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी
आतापर्यंत १२ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले
आहेत. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांमध्ये डीकेएसझेड, डीव्हीसीएम आणि एसीएम कॅडरचे मोठे कॅडर मारले
जाण्याची शक्यता आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख केली जात आहे. एसटीएफ आणि
डीआरजीचे दोन जवान जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.