सुप्रीम कोर्टाने NEET
परीक्षा २०२४ बद्दल एक मोठा निर्णय दिला आहे. तसेच याबाबत केंद्र
सरकारला नोटीस देखील पाठवली आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET-2024 चा निकाल जाहीर
करण्यावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सरन्यायाधीश डीवाय
चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने केंद्र सरकारला नोटीस बजावून या
प्रकरणाची पुढील सुनावणी उन्हाळी सुट्टीनंतर घेण्याचे आदेश दिले आहेत. अखिल भारतीय
परीक्षेवर न्यायालय बंदी घालू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
वंशिका यादव यांनी दाखल केलेल्या
याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी वकील सनी कादियान म्हणाले की, राजस्थानमध्ये NEET परीक्षेदरम्यान पेपर फुटल्याची बातमी
वृत्तपत्रांमध्ये आली होती. परीक्षेच्या एक दिवस अगोदर पेपर आल्याचे सांगण्यात
आले. बिहारच्या आर्थिक आणि सायबर गुन्हे विभागाने तपास केला असता, या प्रकरणात एक संघटित टोळी कार्यरत
असल्याचे आढळून आले.