देशभरात लोकसभा निवडणुकीचा प्रचार दिवसेंदिवस तीव्र होताना दिसून येत
आहे. सर्व पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. इंडिया आघाडीने एनडीएला यंदाच्या
निवडणुकीत पराभूत करण्याचा चंग बांधला आहे. तर एनडीएने केंद्रात तिसऱ्यांदा सरकार
स्थापन करण्यासाठी प्रचाराला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात
प्रचार सभांचा धडाका लावला आहे. तर नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान
करण्यासाठी महाराष्ट्रात महायुतीने ४५ प्लस मिशन डोळ्यांसमोर ठेवले आहे. आज आपण
उत्तरं मुंबई लोकसभा मतदारसंघाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तिथे महायुती आणि
महाविकास आघाडीने, वंचित
बहुजन आघाडीने कोणाला उमेदवारी दिली आहे.
राजकीय ताकद कशी आहे. तेथील प्रश्न कोणते
आहेत, हे जाणून घेणार
आहोत.
नमस्कार. मी तेजस भागवत. ऋतं
मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आज आपण उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाबद्दल
जाणून घेणार आहोत. या ठिकाणी महायुतीने विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना तिकीट
नाकारून केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना तिकीट दिले आहे. पियुष गोयल हे
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या अतिशय निकटवर्तीय समजले जातात. पियुष गोयल
यांच्यासमोर मागच्या वेळेसचे मताधिक्य राखण्याचे आव्हान असणार आहे.
२०१९ मध्ये गोपाळ शेट्टी हे तब्बल ४ लाखांच्या मताधिक्याने विजयी
झाले होते. राज्यातील सर्वाधिक मताधिक्य शेट्टी यांनी घेतले होते. मात्र यावेळी
पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली आहे. समोरून महाविकास आघाडीने काँग्रेसकडून भूषण
पाटील यांना तिकीट दिले आहे. भाजपासाठी लढत सोपी वाटत असली तरी देखील इथे मराठी
-अमराठी हा प्रचाराचा मुद्दा यांच्यासाठी तापदायक ठरू शकतो. भूषण पाटील यांचे
राजकारणात फारसा अनुभव नसल्याचे म्हटले जाते. महाविकास आघाडीकडून गोयल हे आयात
किंवा पॅराशूट उमेदवार असल्याचा प्रचार केला जात आहे.
पियुष गोयल हे पाहियल्यांदाच लोकसभा लढवत आहेत. आतापर्यंत ते
राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले होते. त्यामुळे या मतदारसंघाची फारशी माहिती
त्यांना नाही, जनसंपर्क
नाही असा प्रचार भूषण पाटील यांच्याकडून केला जात आहे. उत्तर मुंबईत येणाऱ्या ६
विधानसभा मतदारसंघात ४ आमदार हे भाजपाचे व एक आमदार हे शिवसेनेचे आहेत. या ठिकाणी
महाविकास आघाडीचा एकच आमदार आहे. त्यामुळे महायुतीची ताकद येथे मोठ्या प्रमाणात
दिसून येत आहे.
उत्तर मुंबईत संमिश्र लोकवस्ती
असल्याचे पाहायला मिळाले. या ठिकाणी मराठी, गुजराती, कोळी
आणि उत्तर भारतीय, मुस्लिम
आणि ख्रिश्चन नागरिक मोठ्या प्रमाणात आहेत. मागच्या निवडणुकीत शेट्टी यांनी
उर्मिला मातोंडकर यांचा प्रभाव केला. शेट्टी २०१४ आणि २०१९ मध्ये मोदी लाटेत
प्रचंड मताधियाने निवडून आले आहेत. मात्र यंदा इथे महाविकास आघाडी देखील मजबूत
असल्याचे चित्र दिसत आहे. भूषण पाटील हे स्थानिक असल्याने त्यांचा जनसंपर्क चांगला
आहे.
तर गोयल यांनी देखील उमेदवारी जाहीर
झाल्यापासून जोरदार प्रचार केला आहे. महायुतीचे ५ आमदार, नरेंद्र मोदींसाठी मतदान करणारे मतदार, १० वर्षातील विकासकामे, भाजपाची संघटनात्मक ताकद अशा जोरावर
गोयल प्रचार करत आहेत. त्यांच्या प्रचार सभांना आणि फेर्यांना उत्तम असा प्रतिसाद
देखील मिळताना दिसून येत आहे. मात्र यंदा २०१४ आणि २०१९ प्रमाणे मोदी लाट दिसून
येत नाहीये. त्यामुळे गोयल यांना शेट्टी यांच्याप्रमाणे प्रचंड मताधिक्याने निवडून
अणे हे महायुतीसमोरील एक आव्हानच म्हणावे लागेल.दरम्यान इथून कोण विजयी होते ते ४ तारखेला स्पष्ट
होणारच आहे.