सध्या लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात सर्व पक्षांचा प्रचार मोठ्या उत्साहात आणि जोरदारपणे सुरु आहे. दरम्यान भाजापच्या स्टार प्रचारकांमध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांचा देखील समावेश आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी रविवारी दुबे छपरा येथे बलिया लोकसभा उमेदवार नीरज शेखर यांच्या समर्थनार्थ एका निवडणूक रॅलीला संबोधित केले. मथुरेकडे बोट दाखवत ते म्हणाले की, अयोध्येत श्रीरामानंतर आता मथुरेत श्रीकृष्णाची पाळी आहे.
काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर निशाणा साधत मुख्यमंत्री म्हणाले की, ”पंचवीस कुटुंबांनी त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती पंतप्रधान आणि मुख्यमंत्री होईल, अशी आश्वासने दिली होती. गरिबांचे पुत्र नरेंद्र मोदी यांनी हा समज मोडीत काढला. २०१४ मध्ये तुमच्या एका मताच्या ताकदीने देशातील दहशतवाद संपला. भारताने देशाचा शत्रू पाकिस्तानला त्यांच्या घरात घुसून ठार मारल्याचे प्रथमच घडले. घरात घुसून हत्या करणारा भारत अमेरिका आणि इस्रायलनंतरचा तिसरा देश ठरला आहे.