नुकतंच गुजरात एटीएसला मोठे यश मिळाले आहे. गुजरात एटीएसने इसिसच्या चार दहशतवाद्यांना अटक केली आहे. एटीएसने अहमदाबाद विमानतळावरून चार इसिस दहशतवाद्यांना अटक केली आहे. तसेच सध्या पुढील तपास सुरू आहे.
याप्रकरणी समोर आलेल्या माहितीनुसार, चार दहशतवादी श्रीलंकेतून चेन्नई आणि त्यानंतर अहमदाबादला पोहोचले होते. जिथून चौघांनाही आपापल्या टार्गेटच्या ठिकाणी पोहोचायचे होते. हे दहशतवादी कोणतीही मोठी घटना घडवण्यापूर्वीच गुजरात एटीएसने या दहशतवाद्यांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे चारही दहशतवादी श्रीलंकेचे नागरिक असून ते इस्लामिक स्टेट (ISIS) या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा संशय आहे. अद्याप या दहशतवाद्यांची ओळख समोर आलेली नाही. तसेच हे दहशतवादी काही मोठे ऑपरेशन करण्याचा कट रचत होते, असे मानले जात आहे.