दिल्ली दारू घोटाळ्यातील मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीचे माजी
उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू
कोर्टाने ३१ मे पर्यंत वाढ केली आहे. सिसोदिया यांची न्यायालयीन कोठडी आज संपणार
होती. त्यानंतर त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात
आले. ईडी आणि सीबीआय प्रकरणात मनीष
सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर आज दिल्ली उच्च न्यायालय निकाल देणार आहे. या
प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना नियमित
जामीन मंजूर केला आहे.
ईडीने ९ मार्च २०२३ रोजी चौकशीनंतर या
प्रकरणी मनीष सिसोदिया यांना तिहार तुरुंगातून अटक केली होती. सिसोदिया यांना
यापूर्वी २६ फेब्रुवारी २०२३ रोजी सीबीआयने अटक केली होती. मनीष सिसोदिया यांनी
दिल्ली उच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका दाखल केली आहे, ज्यावर दिल्ली
उच्च न्यायालयाने १४ मे रोजी निर्णय राखून ठेवला होता.