पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या मोठ्या अपघातामुळे सगळीकडे संतापाचं वातावरण आहे. प्रसिद्ध व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा वेदांत अग्रवाल याने पोर्शे कारने दोनजणांना मागून जोरात धडक दिली. या अपघातात एका तरूणाचा आणि तरूणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान काल पुणे पोलिसांनी वेदांत अगरवाल यांचे वडील विशाल अग्रवाल यांना छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली. आरोपी विशाल अग्रवाल याला आज जिल्हा सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान न्यायालयाने त्याला २४ मे पर्यंत कोठडी सुनावली आहे.
तसेच एकीकडे त्याचा मुलगा वेदांत अग्रवाल याला देखील बालहक्क कोर्टासमोर हजर करण्यात आले आहे. बालहक्क कोर्ट दुपारी साडेचार नंतर आपला निर्णय देणार आहे. निर्णय पुणे पोलिसांच्या बाजूने आल्यास वेदांत अग्रवाल यांना जागेवरच अटक केली जाण्याची शक्यता आहे. सध्या पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या अपघातामुळे सगळीकडे संतापाचं वातावरण आहे. एका प्रसिद्ध व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने पोर्शे कारने दोनजणांना मागून जोरात धडक दिली. या अपघातात एका तरूणाचा आणि तरूणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर अल्पवयीन मुलाला अवघ्या पाच तासांमध्ये काही अटी शर्तींसह जामीन मिळाला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.