लोकसभा निवडणुकीसाठी ५ टप्प्यातील मतदान पुनः झाले आहे. अखेरच्या २
टप्प्यातील मतदान बाकी आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभरात प्रचार
सभांचा धडाका लावत आहेत. एनडीएच्या उमेदवारासाठी मोदी स्वतः प्रचार सभा घेत आहेत.
दरम्यान त्यांनी आज उत्तरप्रदेशच्या बस्ती येथे प्रचारसभेला संबोधित केले. यावेळी
त्यांनी संविधान बदलांच्या आरोपांवरून काँग्रेसवर टीका केली आहे. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी बस्ती, संत कबीरनगर आणि डुमरियागंज या तीन
लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या समर्थनार्थ मतदान करण्याचे आवाहन केले.
बस्ती येथील प्रचार सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,
”या
लोकसभा मतदारसंघानी आमच्यावर विश्वास ठेवला आहे. त्यामुळे मी तुमच्या विश्वासाला
तडा जाऊ देणार नाही. आपल्या भाषणात
मोदींनी काँग्रेस आणि सपाला आरक्षणविरोधी म्हणून संबोधले. तसेच पाच
टप्प्यातच मोदी सरकार स्थापन करण्याचा दावा केला. या सभेत त्यांनी उत्तर
प्रदेशातील सपा सरकारच्या गुंडगिरीचाही उल्लेख केला. देशात पाच टप्प्यात निवडणुका
झाल्या आहेत. या पाच टप्प्यांमध्येच मोदी सरकार आले आहे. इंडी आघाडी कोणते आकडे
सांगत आहे ते माहित नाही.”
पुढे बोलताना मोदी म्हणाले, ”परिवारवादी
पक्षांनी तुष्टीकरणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. आपला देश पाचशे वर्षे राम
मंदिराची वाट पाहत होता. भारत आघाडीच्या लोकांना राम मंदिर नको आहे. राम मंदिरात
जाणारे लोक ढोंगी असल्याचे सपाचे लोक म्हणतात. हे लोक सनातन धर्म नष्ट करण्याविषयी
बोलतात. या सगळ्यात काँग्रेस पुढे आहे. काँग्रेस राम मंदिराला बाबरी नावाचे कुलूप
लावण्याचे स्वप्न पाहत आहे.त्यांना रामलल्लाला पुन्हा तंबूत पाठवायचे आहे.
काँग्रेसला अचानक संविधानाची आठवण झाली. याच काँग्रेसने देशात आणीबाणी लादून
राज्यघटना रद्द करण्याचा प्रयत्न केला.”