Vishal Agarwal : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या अपघाताने सगळ्यांनाच हादरवून सोडलं आहे. बांधकाम व्यावसायिक असलेला विशाल अग्रवाल याचा मुलगा वेदांत अग्रवालने मध्यरात्री पोर्शे कारने एका दुचाकीला मागून जोराद धडक दिली. या अपघातात एका तरूणाचा आणि तरूणीचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर राज्यभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या अपघातप्रकरणी विशाल अग्रवालला पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे. तर त्याला काल न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर आता पोलीस कोठडीमध्ये विशाल अग्रवालने मोठी कबुली दिली आहे.
पुणे पोलिसांनी विशाल अग्रवालची कसून चौकशी केली आहे. तर अग्रवालने आज कोठडीमध्ये गुन्ह्याची कबुली दिली आहे. आपण आपल्या अल्पवयीन मुलाच्या हातात गाडी देऊन चूक केली असल्याचं विशाल अग्रवालने चौकशीवेळी म्हटलं आहे.
दरम्यान, या अपघात प्रकरणानंतर अल्पवयीन मुलाला पोलिसांनी 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावली होती. तसेच त्याची सुटका देखील करण्यात आली होती. यानंतर या प्रकणावरून वाद वाढत गेल्याने न्यायालयाने मुलाचा जामीन रद्द करून त्याची रवानगी बाल निरीक्षण गृहात केली आहे.