आणि बुद्ध हसला हे शब्द आहेत. .. तत्कालीन पंतप्रधान मा. अटल बिहारी वाजपेयी यांचे.
११ मे १९९८.(बुध्द पौर्णिमा) हा दिवस पोखरण( जैसलमेर- राजस्थान) इथे भारताने अणु चाचणी करून भारताची अण्विक समर्थता जगाला दाखवुन दिली. आज ह्या घटनेला २६ वर्षे झाली.
अण्विक शक्ती / परमाणू उर्जा फक्त विकसित राष्ट्रांची मक्तेदारी आहे. असा आभास निर्माण केला होता. आणि जर कमकुवत राष्ट्रानी अणुस्फोट घडवला तर अनेक जागतीक बंधन त्या देशावर घातली जायची. पण ह्या सगळ्या गोष्टी झुगारुन भारत सुध्दा अणुस्फोट करू शकतो हा ठाम निर्णय घेतला तो तत्कालिक पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी. आणि ह्या प्रकल्पाच नेतृत्व केले मिसाईल मॅन मा. अब्दुल कलाम यांनी.
ह्या प्रकल्पा बद्दल खुप गुप्तता पाळण्यात आली. खर तर पोखरण मधल्या खेतोलाई गावामधे ही अणुचाचणी झाली पण हा भाग मिलिटरी च्या firing range मधे असल्याने सतत धमाके ह्या परिसरात होत असत.
पण ह्या दिवशी लोकांना घरातून बाहेर काढण्यात आले . मग विस्फोट करण्यात आला, यावली सुरवातीला भुकंप झाल्यासारखा भास झाला. नंतर जेव्हा सर्व जगाचे डोळे विस्फारले आणि कळले की हा भारताने घडवलेला अणूस्फोट होता.
मग गावकऱ्यांचा ऊर पण अभिमानाने भरून आला. भारतानी आपली क्षमता जगाला दाखवुन दिली होती आणि त्या घटनेचा भाग आपण आहोत हे त्या गावच्या लोकांसाठी अभिमानास्पद होते.
नंतर प्रेस conference मधे मा. वाजपेयी यांनी ” बुध्द हसला” असे विधान केले , कारण तो दिवस बुध्द पौर्णिमेचा होता. खर तर जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान बुध्द आणि त्यांच्याच महानिर्वाणाच्या दिवशी अणुस्फोट ही विरोधाभास वाटावी अशी गोष्ट पण भारतानी आपली क्षमता दाखवुन भारताकडे कोणी वाकड्या नजरेने पहाणार नाही. भारताची ही क्षमता भारतीय संशोधक वैज्ञानिक प्रगल्भता आणि भारताच्या पंतप्रधानांनी घेतलेला धाडसी निर्णय हे पाहुन भगवान बुध्दांना सुध्दा समाधान वाटल असेल असाच आशय ह्यातुन स्पष्ट होतो.
वंदेमातरम्
शुभांगी देवधर, नाशिक
सौजन्य -समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत