लोकसभा निवडणुकीसाठी ५ टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. अखेरच्या २
टप्प्यातील मतदान बाकी राहिले आहे. दरम्यान महाराष्ट्रातील ४८ जागांवरील मतदान
पूर्ण झाल्याने भाजपच्या स्टार प्रचारक यादीत नाव असलेले देवेंद्र फडणवीस हे सध्या
दिल्लीत प्रचार करत आहेत. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असून,
राज्यातील
भाजपाचे वरिष्ठ नेते आहेत. दरम्यान आज फडणवीसांनी उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातील
मनोज तिवारी यांच्यासाठी प्रचारसभेला संबोधित केले. तर काँग्रेसने या ठिकाणाहून
कन्हैया कुमारला तिकीट दिले आहे. दरम्यान फडणवीसांनी दिल्लीच्या जनतेला काय आवाहन
केले आहे ते जाणून घेऊयात.
उत्तर-पूर्व दिल्लीतील प्रचारसभेत
बोलताना फडणवीस म्हणाले, ”या ठिकाणची लढाई मनोज तिवारी विरुद्ध
तुकडे तुकडे गॅंगचे कन्हैया कुमार
यांच्यात आहे . स्वाती मालिवाल जे सांगत आहे ते खोटे आहे का हे केजरीवालांनी
सांगावे. केजरीवाल यांना सहानभूती नाहीये.” देवेंद्र
फडणवीसांनी कन्हैया कुमारवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान दिल्लीत ७ जागांवर मतदान
होणार आहे. मनोज तिवारी आणि देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या प्रचार रॅलीला मोठा
प्रतिसाद मिळाला.