आम आदमी पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार स्वाती मालिवाल यांच्याशी
गैरवर्तन केल्याप्रकरणी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या पीए विभव कुमारला अटक
करण्यात आली आहे. त्यानंतर स्वाती मालिवाल आणि आम आदमी पक्षात आरोप-प्रत्यारोप
सुरु झाले आहेत. तसेच राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देणार नसल्याचे स्वाती
मालिवाल यांनी स्पष्ट केले आहे.
आम आदमी पक्षाच्या (आप) राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी आज आपण
पॉलीग्राफ चाचणीसाठी तयार असल्याचे म्हटले आहे. पीडितेला अपमानित केल्याचे त्यांनी
आरोप केला आहे. स्वाती मालिवाल यांनी आज एनआयला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या प्रकाराबद्दल भाष्य केले.
राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल
यांच्यासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आठवड्याभरानंतर मोठी कारवाई
केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांनी
स्वाती मालीवाल यांच्यावर केलेल्या कथित गैरवर्तन प्रकरणाच्या चौकशीसाठी दिल्ली
पोलिसांनी एसआयटी स्थापन केली आहे. या एसआयटीचे नेतुत्व अतिरिक्त DCP (उत्तर)
अंजिता चेप्याला या करणार आहेत.