Loksabha Election 2024 : सात टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणूक 2024 च्या सहा टप्प्यातील प्रचाराचा टप्पा संपला आहे. आता शेवटच्या टप्प्यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर आज अनेक बड्या नावांनी विविध भागात आवाज उठवण्याची तयारी केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीची लढाई जिंकण्यासाठी भव्य सभा घेत आहेत. ते आज हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये जाहीर सभांना संबोधित करणार आहेत.
पंतप्रधान मोदींनी आज सकाळी 11 वाजता हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे जाहीर सभेला संबोधित केले. तर दुपारी 1.15 वाजता त्यांनी मंडीतील जाहीर सभेला संबोधित केले. तर मंडी येथून आता पंतप्रधान मोदी पंजाबला रवाना होणार आहे. येथे ते गुरुदासपूरमध्ये दुपारी 3:30 वाजता आणि जालंधरमध्ये 5:30 वाजता जाहीर सभांना संबोधित करणार आहेत.
दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सकाळी 11:30 वाजता बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील आरा येथे जाहीर सभेला संबोधित केले. त्यानंतर त्यांनी झारखंडमधील जामतारा येथे दुपारी अडीच वाजता एका सभेला संबोधित केले. तर मधुपूर येथे दुपारी 4 वाजता ते रॅलींना संबोधित करणार आहेत. अमित शाह यांच्यासोबतच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा उत्तर प्रदेशमध्ये तीन जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. दुपारी 1 वाजता त्यांनी कुशीनगर येथील सभेला संबोधित केले तर दुपारी 3 वाजता बलिया आणि संध्याकाळी 5:05 वाजता रॉबर्टसगंज येथे ते जाहीर सभांना संबोधित करतील.
तर यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराजगंजमध्ये सकाळी 11:35 वाजता, कुशीनगरमध्ये 12:50 वाजता, देवरियाच्या पाथरदेवामध्ये 1:50 वाजता, देवरियाच्या बरहजमध्ये दुपारी 3 वाजता आणि गोरखपूरमध्ये 4:15 वाजता जाहीर सभांना संबोधित करतील. तसेच काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे देखील झारखंडमधील देवघर येथे आज दुपारी जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.