आम आदमी पक्षाच्या राज्यसभा सदस्य स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने आरोपी बिभव कुमारला २८ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांची कोठडी संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर झालेल्या सुनावणीनंतर विभव कुमारला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तीस हजारी न्यायालयाने बिभव कुमारला १८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. १८ मे रोजीच तीस हजारी न्यायालयाने बिभव कुमारचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.
राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आठवड्याभरानंतर मोठी कारवाई केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांनी स्वाती मालीवाल यांच्यावर केलेल्या कथित गैरवर्तन प्रकरणाच्या चौकशीसाठी दिल्ली पोलिसांनी एसआयटी स्थापन केली आहे. या एसआयटीचे नेतुत्व अतिरिक्त DCP (उत्तर) अंजिता चेप्याला या करणार आहेत.