लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. आज ६ व्या टप्प्यातील मतदान होत आहे. ८ राज्यांमधील ५८ जागांसाठी आज मतदान सुरु आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. आज तब्बल ११.३ कोटींपेक्षा जास्त नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर एकूण ८८९ उमेदवारांचे भवितव्य EVM मध्ये बंद होणार आहे. आज ६ व्या टप्प्यात एकूण ५८ जागांवर मतदान सुरु झाले आहे. दरम्यान आज दुपारी १ वाजेपर्यंत ३९.१३ टक्के मतदान देशभरात झाले आहे. कोणत्या राज्यात किती टक्के मतदान झाले आहे, ते जाणून घेऊयात.
राज्यनिहाय मतदानाची टक्केवारी
बिहार- 36.48%
हरियाणा- 36.48%
जम्मू-कश्मीर- 35.22%
झारखंड- 42.54%
दिल्ली- 34.37%
ओडिशा- 35.69%
उत्तर प्रदेश- 37.23%
पश्चिम बंगाल- 54.84%