प्लेगच्या साथीमध्ये लक्षावधी माणसे मेली. त्यावेळी इंग्रजांनी घरांच्या झडत्या घेतल्या. घरात घुसून प्लेग झालेल्यांना बाहेर काढणे, घर फोडणे, सामान जाळणे, देवघरातली देव फेकून देणे असे अत्याचार केले. इंग्रजांचा सूड घेण्यासाठी प्लेग कमिशनर रँड आणि आयर्स्ट या इंग्रज अधिकाऱ्यांना ठार मारण्यात आले. चाफेकर बंधूंना अटक झाल्यावर त्यांनी रँड आणि आयर्स्टना आम्हीच ठार मारले हे मान्य केले. म्हणून चाफेकर बंधूंना फाशी देण्यात आले.
चाफेकरांचे कार्य पुढे चालवण्याचा विचार विनायकाच्या मनात आला. माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी सशस्त्र युद्धात चाफेकरांसारखा मरेन किंवा शिवाजी सारखा माझ्या मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा राज्याभिषेक करवीन, अशी प्रतिज्ञा चाफेकरांच्या फाशीनंतर आपल्या घरच्या चिमुकल्या देवी अष्टभुजे पुढे घेतली तेव्हा त्यांचे वय फक्त १५ वर्षांचे होते.
बालवयात देशाच्या स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेले देशभक्त एकच आणि ते म्हणजे विनायक दामोदर सावरकर .
हे व्यक्तिमत्व इतकं प्रचंड मोठ आहे की त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल लिहिताना काही ठळक घटना इथे नमूद करणं शक्य आहे
वयाच्या 17 व्या वर्षी मित्रांसमवेत राष्ट्रभक्त समूह ही गुप्त संस्था स्थापन केली
महाविद्यालयात असतानाच जयोस्तुते हे सुप्रसिद्ध स्तोत्र त्यांनी रचले
1905 साली सावरकरांच्या कल्पनेतून पहिली परदेशी कापडांची होळी पेटवण्यात आली.
1907 मध्ये इटालियन भाषेतील मॅझीनी चे मूळ चरित्र मराठी मध्ये अनुवादित केले आणि त्याची पहिली आवृत्ती एका महिन्यात संपली आणि तिच्यावरती सरकारने जप्ती आणली.
इंडिया हाऊस मध्ये असताना सहा महिन्याच्या अवधीत *1857 चे पहिले स्वातंत्र्यसमर* हा ग्रंथ लिहिला
क्रांतीकारकांचे सर्वमान्य पुढारी म्हणून सावरकरांना अटक करून त्यांच्यावरती खटला चालवण्यात आला या खटल्यासाठी सावरकरांना जन्मठेप व काळे पाणी या शिक्षा सुनावण्यात आल्या 23 जानेवारी 1911 ला जॅक्सनच्या वधाचा कट आणि इतरांना सहाय्य या आरोपाखाली तिसरा अभियोग सुरू झाला ह्या खटलातही सावरकरांना जन्मठेप आणि काळे पाणी ही शिक्षा सुनावण्यात आली म्हणजेच दोन जन्मठेपेच्या शिक्षा – पन्नास वर्ष अशी ही शिक्षा होती अंदमानच्या काळ्यापाण्याच्या शिक्षेमध्ये अनन्वित हाल अपेष्टा सोसल्यामुळे त्यांची प्रकृती ढासळली. अंदमानातील बंदिवानांच्या हाल अपेक्षांचे वृत्त सुरेंद्रनाथ बॅनर्जी, लोकमान्य टिळक अशा प्रभुतींनी राजबंदांच्या मुक्ततेचा केलेला पाठपुरावा, सहस्त्रावधी स्वाक्षर्यांची यांची निवेदने याचा परिणाम होऊन 2 मे 1921 ला त्यांची अंदमान कारागृहातू न सुटका झाली आणि ताबडतोब रत्नागिरी येथे त्यांना स्थानबद्ध करण्यात आले.
अंदमानातल्या भयंकर हाल अपेष्टांमध्ये ही ह्या प्रतिभावान कवीने *कमला* नावाचे काव्य भिंतीवरती विटेच्या तुकड्यांनी लिहले
स्थानाबद्दतेत राहून सुद्धा अनेक सामाजिक कार्यांमध्ये सावरकर क्रियाशील राहिले. माझी जन्मठेप हा आत्मचरित्रात्मक ग्रंथ ही त्यांनी रत्नागिरीमध्येच लिहिला.
समाजातील जातीभेदा विरूध्द काम केल. पतितपावन मंदिराची स्थापना केली
प्रखर देशभक्त, प्रगल्भ बुद्धिमत्ता संवेदनशील कवी, ग्रंथकार नाटककार समाजकारण आणि राजकारण जाणणारा असे या व्यक्तिमत्त्वाचे पैलू होते. वीर सावरकरांच्या समर्पणाला आणि त्यागाला कोटी कोटी प्रणाम.
उल्का क्षीरसागर, नाशिक
सौजन्य -समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र