Tejashwi Yadav On Nitish Kumar : राष्ट्रीय जनता दल (RJD) नेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे. तेजस्वी यादव म्हणाले की, त्यांचे काका म्हणजेच मुख्यमंत्री नितीश कुमार हे 4 जूननंतर कोणताही मोठा निर्णय घेऊ शकतात. तेजस्वी यांनी केलेल्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
तेजस्वी यादव यांनी आज पाटण्यात माध्यमांशी बोलताना मोठा दावा केला आहे. नितीश कुमार हे आपला पक्ष आणि मागासवर्गीय राजकारण वाचवण्यासाठी कोणतेही पाऊल उचलू शकतात, असे वक्तव्य तेजस्वी यादव यांनी केले आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तसेच पत्रकारांनी तेजस्वी यांना विचारले की नितीश सोबत येणार का? त्यावर त्यांनी 4 जूनपर्यंत थांबा, असे उत्तर दिले.
दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यावर्षी लोकसभा निवडणुकीपूर्वी आरजेडी सोडली होती आणि एनडीएमध्ये परतले होते. यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अनेक सभा घेतल्या. या बैठकींमध्ये नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदींना आश्वासन दिले की ते दोनदा मार्ग गमावले आहेत आणि आता ते भाजपशिवाय कुठेही जाणार नाहीत. तर आता तेजस्वी यादव यांनी केलेल्या दाव्यानंतर नितीश कुमार पुन्हा भाजपची साथ सोडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.