उत्तर पूर्व दिल्लीमध्ये २०२० मध्ये मोठ्या प्रमाणात दंगल झाली हत्ती. या प्रकरणात पोलिसांनी उमर खालिदला अटक करण्यात आली होती. दरम्यान आज कोर्टात या प्रकरणावर सुनावणी पार पडली. दरम्यान कोर्टाने या प्रकरणातील आरोपी उमर खालिदचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. खालिदविरुद्ध बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यांतर्गत (UAPA) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक गंभीर आरोप असलेले इतर आरोपी जामिनावर बाहेर असल्याचे त्यांनी यापूर्वी दिल्ली न्यायालयात सांगितले होते. दरम्यान कोर्टाने याचिका फेटाळून लावल्याने उमर खालिदच्या अडचणीत वाढ झाली आहे.
2020 मध्ये दिल्लीत दंगल झाली होती. या दंगलीचे नियोजन हे उमर खालिद यांच्यासह अनेकनाई रचल्याचा आरोप त्यांच्यवर ठेवण्यात आला आहे. या दंगलीत ५० पेक्षा जास्त नागरिकांचा बळी गेला होता. तर शेकडो जण जखमी झाले होते. अराजकता माजविण्याचा आरोप उमर खालिदवर ठेवण्यात आला आहे. उमर खालिदने दुसऱ्यांदा कोर्टात जामीन याचिका केली होती. मात्र कोर्टाने त्याची याचिका फेटाळून लावली आहे.