सध्या महाराष्ट्रात काही भागात पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. सध्या
राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसत आहे. वळवाचा पाऊस देखील काही ठिकाणी सुरु आहे.
मात्र राज्यातील पाण्याचे दुर्भिक्ष वाढताना दिसत आहे. राज्यातील मराठवाड्यात
पाण्याची टंचाई वाढत आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत आहे.
पाण्याअभावी राज्यातील धरणे तळ गाठताना दिसत आहेत. सोलापूर शहरात देखील पाण्याची
भीषण टंचाई निर्माण झाली आहे. पुणे आणि सोलापूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या
उजनी धरणानेही तळ गाठला आहे.
राज्यातील सर्व प्रमुख धरणांमधील
पाणीसाठा खूप प्रमाणात कमी होत आहे. कमी झाला आहे. राज्यातील प्रमुख धरणांतील
पाणीसाठा २४ टक्क्यांवर आला आहे. २३ जिल्ह्यांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण
झाली आहे. अनेक गावांमध्ये पाणीसाठा संपत
आलेला आहे.. अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा होत आहे. केवळ मराठवाडाच नव्हे तर
राज्यातील अनेक धरणांमध्ये पाणीसाठा तळाशी पोचला आहे. त्यामुळे शेतीबरोबर
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर होण्याची शक्यता आहे. धरणसाठ्यातील
पाणीसाठा कमी होत असल्याने प्रशासन आणि सरकार कशाप्रकारे पाण्याचे नियोजन कसे करते
हे महत्वाचे ठरणार आहे.