सार्वत्रिक निवडणुकीच्या शेवटच्या आणि सातव्या टप्प्यातील प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे.देशभरात जोरदार प्रचार करून मतदारांचे आशीर्वाद घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज संध्याकाळ अखेर कन्याकुमारीला पोचणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा कार्यक्रम भाजपने आपल्या एक्स हँडलवर शेअर केला आहे.
यावेळी सार्वत्रिक निवडणुकीत 400 चा आकडा पार करण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी देशभरात जोरदार प्रचार करून मतदारांचे आशीर्वाद घेतले आहेत. पंजाबमधील होशियारपूर येथे यावेळच्या निवडणुकीतली प्रचाराची शेवटची फतेह रॅली आटपून ते कन्याकुमारीला रवाना होतील.त्यांनतर पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी 5.15 वाजता कन्याकुमारी, तामिळनाडू येथे देवाची पूजा करणार आहेत.
कन्याकुमारीमध्ये पंतप्रधान भगवती अम्मन मंदिरात दर्शन आणि पूजा करतील. येथे पंतप्रधान स्मारक रॉक मेमोरियलमध्ये ध्यानधारणा करतील. ते आज संध्याकाळपासून ते १ जूनच्या संध्याकाळपर्यंत ध्यानमंडपमध्ये ध्यान करतील.विशेष गोष्ट म्हणजे हे तेच ठिकाण आहे जिथे स्वामी विवेकानंदांनी देशव्यापी दौऱ्यानंतर तीन दिवस ध्यानधारणा केली होती. येथेच त्यांनी विकसित भारताचे स्वप्न पाहिले होते.
विवेकानंद 24 डिसेंबर 1892 रोजी पोहत समुद्रकिनाऱ्यापासून 500 मीटर अंतरावर असलेल्या खडकावर पोहोचले. 25 ते 27 डिसेंबर या कालावधीत त्यांनी या खडकावर ध्यान केले. त्यांनी येथील भारताच्या भविष्यासाठी विकसित भारताचे स्वप्न पाहिले. याच ठिकाणी त्यांनी आपले उर्वरित आयुष्य लोकांसाठी समर्पित करण्याचे स्वप्न पाहिले. विवेकानंद खडकावर पुढे बऱ्याच संघर्षानंतर विवेकानंद स्मारक उभे राहिले. यात एकनाथजी रानडे यांचा मोठा वाटा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये 48 तास (30 मेच्या रात्री ते 1 जूनच्या संध्याकाळपर्यंत) ध्यान करणार आहेत. 2019 च्या शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोदी केदारनाथला गेले होते. तेथे बांधलेल्या रुद्र गुहेत त्यांनी 17 तास ध्यान केले होते.तर २०१४ साली ते निवडणुकीनंतर प्रतापगडावर गेले होते.