Monsoon Update : सध्या संपूर्ण देशभरात उन्हाचा तडाखा जाणवत असून सर्व लोक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे प्रत्येकजण मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर आता ही प्रतिक्षा संपली आहे. कारण मान्सूनचे केरळ आणि उत्तर पूर्व भारतात दमदार अशी हजेरी लावली आहे. यासंदर्भातली माहिती हवामान विभागानं दिली आहे.
मान्सूनच्या आगमनाबाबत हवामान विभागानं ट्विटरवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. आज 30 मे 2024 रोजी नैऋत्य मोसमी पावसाने केरळमध्ये आणि ईशान्य भारताच्या बहुतांश भागात प्रवेश केला आहे, अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे.
https://x.com/Indiametdept/status/1796048018317197347
दरम्यान, मागील काही दिवसांपासून मोसमी वाऱ्याचा वेग मंदावला होता. तर आता मान्सूनच्या आगमनासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे लवकरच केरळमध्ये मोसमी वारे दाखल होणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. तसेच येत्या 10 जूनपर्यंत राज्यामध्ये मान्सून दाखल होणार असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.