2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या शेवटच्या टप्प्याच्या मतदानापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने बुधवारी मोठी कारवाई केली आहे. बेकायदेशीर खाण प्रकरणात, ईडीने पंजाबमधील रोपर (रूपनगर) जिल्ह्यातील 13 ठिकाणी छापे टाकले आहेत. या कारवाईत त्यांनी 3.5 कोटी रुपये रोख जप्त केले आहेत. ईडीचे छापे अजूनही सुरू असून ईडीला आणखी रोख मिळण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोपरच्या आसपासच्या भागात आणि ईडीने जप्त केलेल्या जमिनीवर बेकायदा खाणकाम केले जात होते. ही जमीन कुख्यात भोला ड्रग्स प्रकरणात ईडीने जप्त केली होती. विशेष न्यायालय पीएमएलएसमोर भोला ड्रग प्रकरणाची सुनावणी गंभीर टप्प्यात आहे.
यामध्ये नसीब चंद (खाण माफिया), श्री राम स्टोन क्रशर आणि इतर अनेकांचा समावेश आहे. झडतीदरम्यान आतापर्यंत साडेतीन कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.