कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियलच्या ध्यान मंडपममध्ये पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांचे ४५ तासांचे ध्यान सुरू झाले आहे. १ जूनपर्यंत ते ध्यानधारणा करणार आहेत. 1892 मध्ये स्वामी विवेकानंदांनी याच ऐतिहासिक ठिकाणी ध्यान केले होते.
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मे रोजी संध्याकाळी कन्याकुमारी येथे पोहोचले. त्यांनी प्रथम भगवती अम्मा देवी मंदिरात जाऊन प्रार्थना केली. यावेळी त्यांनी पांढरा मुंडू (दक्षिण भारतात लुंगीसारखा परिधान केला जाणारा पोशाख) परिधान केला होता. भगवती अम्मा मंदिरात पूजा केल्यानंतर मोदी संध्याकाळी 6.45 वाजता ध्यानाला बसले आहेत .या ४५ तासांत ते नारळाच्या पाण्यासारखे फक्त द्रवपदार्थ घेणार आहेत.
पंतप्रधानांच्या सुरक्षेचा विचार करून कन्याकुमारीमध्ये बहुस्तरीय सुरक्षा बंदोबस्त तयार करण्यात आला आहे. यामध्ये २ हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय तामिळनाडू पोलीस, तटरक्षक दल आणि नौदलाचे तटीय सुरक्षा गटही सुरक्षेसाठी तैनात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्याकुमारीमध्ये ज्या ठिकाणी 45 तास ध्यानधारणा सुरू केली होती, तीच जागा होती जिथे स्वामी विवेकानंदांनी 24, 25 आणि 26 डिसेंबर 1892 रोजी ध्यान केले होते. त्यानंतर हे स्मारक 1963 मध्ये स्वामी विवेकानंदांच्या जन्मशताब्दीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते एकनाथ रानडे यांच्या नेतृत्वाखाली विवेकानंद रॉक मेमोरियल कमिटीने बांधले आहे.